Marathi
Karenses nettskole (कारेन्से चे नेटस्कुले) NoTe नॉर्वेजिअन भाषा ऑनलाईन प्रशिक्षण वेबसाईट वर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. येथे आपल्याला सर्वस्तरीय अभ्यासक्रम शिकण्याची सोय उपलब्ध आहे. आम्ही तयार केलेले नॉर्वेजिअन भाषेचे कोर्स (अभ्यासक्रम) नॉर्वेजिअन टेस्ट आणि बर्गेन टेस्ट या परीक्षांसाठी उपयुक्त आहेत, तसेच UDI आणि Kompetanse Norge मान्यता प्राप्त आहेत. येथे शिकवणारे सर्व शिक्षक मूळचे नॉर्वेजिअन असून त्यांची मातृभाषा देखील नॉर्वेजिअन आहे. सर्व शिक्षक हे नॉर्वेजिअन भाषेचे अनुभवी शिक्षक आहेत.
अभ्यासक्रमाची उपलब्धता- कधीही, कुठेही आणि सहज सुलभ!
आमचे सर्व कोर्स हे ऑनलाईन उपलब्ध असून त्याला वेळेचे अथवा ठिकाणाचे बंधन नाही. तुम्ही जिथे कुठे असाल, दैनंदिन आयुष्यात कितीही व्यस्त असाल, नोकरदार असाल, घरी असाल, विद्यार्थी असाल, तरीसुद्धा कोठेही सहज उपलब्ध आहेत.
आमचे अभ्यासक्रम A१, A२, B१, B२ आणि C१ या levels (स्तरांसाठी) आहेत. प्रत्येक विद्यार्थी आपल्या नॉर्वेजिअन भाषा क्षमते नुसार अभ्यासक्रमाची निवड करू शकतो. आम्ही सांगू इच्छितो की, नित्य २ -3 तास भाषेचा सराव हा आपल्याला आपली भाषा सुधारण्यास व कोर्समधून अधिकाधिक ज्ञान प्राप्त करण्यासाठी फायद्याचा ठरेल.
Health Sector (आरोग्य क्षेत्र) तसेच Barnehage (अंगणवाडी) या ठिकाणी काम करणाऱ्या लोकांसाठी देखील आमच्याकडे Helsenorsk व Barnehagenorsk असे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे नॉर्वेजिअन Oral टेस्ट (तोंडी परीक्षा / नॉर्वेजिअन संवाद सुधारणा ) यासाठी खास संभाषण प्रशिक्षण देखील उपलब्ध आहेत.
तसेच सोशिअल स्टडीस कोर्स (सामाजिक शिक्षण- ५० तास) आमच्याकडे नॉर्वेजीयन, अरेबिक व इंग्रजी भाषेमध्ये उपलब्ध आहेत.
अनुभवी शिक्षक आणि दर्जेदार अभ्यासक्रम-
NoTe हि ऑनलाईन प्रशिक्षण संस्था सन २०१५ मध्ये स्थापन करण्यात आली आहे. शैक्षणिक क्षेत्रातील १५ वर्षांचा अनुभव असणाऱ्या नॉर्वेजिअन शिक्षक Karense (कारेन्से) यांनी अतिशय समर्पकरीत्या या अनुभवाचा उपयोग हा गुणवत्तापूर्ण कोर्स तयार करताना केला आहे. येथे संघातील सर्व शिक्षक हे शैक्षणिक मान्यताप्राप्त आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक वाटचालीत सहाय्य आणि मार्गदर्शन करणारे आहेत. नॉर्वेजिअन प्रशिक्षणासोबत आपण आमच्या इतर विनामूल्य सेवांचा देखील लाभ घेऊ शकता. उदा. Karense YouTube- Channel (कारेन्से युट्युब चॅनेल), Podcast (पॉडकास्ट), Voice Messages (व्हॉइस मेसेज), Instagram (इंस्टाग्राम) आणि Facebook Group (फेसबुक ग्रुप), इत्यादी.
आमच्या विविध Channels (चॅनेल्स) संदर्भात अधिक जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
वैयक्तिक मार्गदर्शन प्रशिक्षण अभ्यासक्रम-
अभ्यासक्रमात वाचन, श्रवण, लेखन आणि ध्वनिमुद्रणाची सोय आहे. विद्यार्थ्यांनी सोडवलेले प्रश्न आणि उत्तरे आमच्या शिक्षकांकडून काटेकोरपणे तपासली जातात, त्यानंतर काही चुका असल्यास विद्यार्थ्यांना त्यासंदर्भात मार्गदर्शन व सल्ला देखील मिळतो की ज्यामुळे आपण पुढील वेळेस अजून चांगल्या रीतीने आपले स्वाध्याय सोडवू शकता.
अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट असणाऱ्या गोष्टी आणि त्याबद्दलची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे वाचा किंवा आपण आम्हाला email वर सुद्धा संपर्क साधू शकता.
आमचे उपलब्ध कोर्स (अभ्यासक्रम) येथे दिलेल्या लिंकवर पाहू शकता.
दर महिन्याला १ तास असे वैयक्तिक मार्गदर्शन (शिक्षकांशी संवाद) यामध्ये समाविष्ट आहे. याचा उपयोग संवाद प्रशिक्षणासाठी केला जातो. यामुळे लेखन वाचनाखेरीज, भाषा, उच्चार आणि संभाषण यामध्ये प्रगती होऊ शकते. तसेच व्याकरण सुधारण्यासाठी अथवा एखाद्या मुलाखतीच्या तयारीसाठी देखील याचा उपयोग करता येऊ शकतो.
या १ तासाच्या वैयक्तिक मार्गदर्शनानंतर प्रत्येकास त्यामध्ये शिकलेल्या गोष्टी, करण्यायोग्य सुधारणा आणि सरावासाठीचे साहित्य देखील दिले जाते.
इंग्रजी भाषा प्रशिक्षण/ कोर्स /अभ्यासक्रम (सर्वस्तरीय)-
NoTe मध्ये सर्वस्तरीय इंग्रजी भाषेचे प्रशिक्षण उपलब्ध आहेत, इतकेच नव्हे तर व्यावसायिक इंग्रजी भाषेचे अभ्यासक्रम (business oriented English course- बिसनेस ओरिएंटेड इंग्लिश कोर्स) देखील उपलब्ध आहेत. या कोर्सेसचा कालावधी १ ते ६ महिने असून B१ या स्तरापर्यंत आहे. आपला अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर अधिक उच्च इंग्रजी शिक्षणासाठी, (शिक्षकांशी संवाद) वैयक्तिक मार्गदर्शनासाठी तास विकत घेण्याची सोय उपलब्ध आहे.
इंग्रजी भाषा प्रशिक्षण हे केवळ इंग्रजी भाषा शिकण्यासाठी नव्हे तर TOEFL/ IELTS या परीक्षांच्या तयारीसाठी देखील उपयुक्त असे आहे, ज्याचा फायदा विद्यापीठातील उच्च शिक्षणासाठी किंवा परदेशात शिकण्यासाठी होऊ शकतो. आमचे या वर्गासाठी असलेले शिक्षक हे अमेरिकन असून ते नॉर्वे स्थित आहेत.
Karense ला भेटण्यासाठी-
Karense YouTube- Channel (कारेन्से युट्युब चॅनेल) वर आपण Karense (कारेन्से) कडून नॉर्वेजिअन कोर्सेसमधील काही भाग शिकू शकता. ऑनलाईन प्रशिक्षण/ कोर्सेस बद्दल जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या Video link(विडिओ लिंक) वर क्लिक करा.
नोंदणीसाठी-
आम्ही नेहमीच नवनवीन विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी व शिकवण्यासाठी उत्सुक असतो. आपण कुठेही राहत असाल, नॉर्वेजिअन भाषेबद्दल कमी अधिक जाणत असला तरी आपल्या सर्वांचे इथे स्वागत आहे.
आपले नॉर्वेजिअन भाषाज्ञान सुधारणे हेच आमचे एकमेव ध्येय!